धक्कादायक: हिंजवडीत नऊ वेगवेगळे मोबाईल क्रमांक वापरुन तरुणीला पाठवले अश्लील मेसेज

0
418

हिंजवडी, दि. २१ (पीसीबी) – नऊ वेगवेगळे मोबाईल क्रमांक वापरुन अज्ञात आरोपीने ३० वर्षीय तरुणीच्या व्हॉट्सअॅप क्रमांकावर अश्लील मेसेज पाठवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना शुक्रवार (दि.१४) ते रविवार (दि.१६) या कालावधीत घडली.

याप्रकरणी पीडित ३१ वर्षीय तरुणीने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार (दि.१४) ते रविवार (दि.१६) या कालावधीत अज्ञात ईशान नावाच्या आरोपीने तरुणीवर लक्ष ठेवून तिच्या व्हॉट्सअॅप क्रमांकावर नऊ वेगवेगळे मोबाईल क्रमांक वापरुन अश्लील मेसेज पाठवले. तसेच वारंवार तिला फोन करुन विनयभंग केला. आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.