धक्कादायक: हिंजवडीत तरुणीसोबतचे अश्लिल व्हिडिओ रेकॉर्ड करुन  तरुणाने उकळले सात लाख

0
2645

चिंचवड, दि. १२ (पीसीबी) – लग्नाचे आमिष दाखवत तरुणीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करुन एका तरुणाने तिच्यासोबतचे अश्लिल व्हिडिओ रेकॉर्ड करुन सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तरूणीला ब्लॅकमेल केले आणि वेळोवेळी एकूण सात लाख रुपये उकळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना सप्टेंबर २०१७ ते ११ डिसेंबर २०१८ दरम्यान हिंजवडी परिसरात घडली.

याप्रकरणी पीडित तरुणीने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, साईनाथ शेट्टी (वय ४४, सध्या रा. ग्रीन्स, थेरगाव, मुळ रा. मयूर टॉवर, मरोळ, अंधेरी इस्ट, मुंबई) या इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी साईनाथ शेट्टी याने सप्टेंबर २०१७ ते ११ डिसेंबर २०१८ या कालावधीत पीडित तरुणीसोबत प्रेमाचे नाटक केले. त्यानंतर तिला लग्नाचे आमिष दाखवून विविध ठिकाणच्या हॉटेल आणि लॉजवर नेऊन तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तसेच त्याचा अश्लिल व्हिडिओ देखील रेकॉर्ड केला. हा व्हिडिओ सोशल मिडीयावर टाकण्याची धमकी देत तो वेळोवळी तरुणीला ब्लॅकमेल करायचा आणि वेळोवेळी असे एकूण सहा ते सात लाख रुपये आणि काही महागड्या वस्तू साईनाथने तरुणीकडून उकळळ्या. तसेच तरुणी गरोदर असतानाही साईनाथ याने जबरदस्तीने पीडितेसोबत शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर तिला शिवीगाळ करीत मारहाणही केली आणि कुटुंबास जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी साईनाथ विरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साईनाथला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पोलीस उपनिरीक्षक कविता रूपनर तपास करत आहेत.