Notifications

धक्कादायक : हिंजवडीत गजबजलेल्या रत्यावरुन तरुणीचे अपहरण करुन कारमध्ये बलात्कार करण्याचा प्रयत्न

By PCB Author

October 26, 2018

चिंचवड, दि. २६ (पीसीबी) –  फोनवर बोलत उभ्या असलेल्या एका तरुणीला कारमधून आलेल्या चौघा अज्ञातांनी कारमध्ये जबरदस्तीने बसून तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना हिंजवडीतील शिवाजी चौक येथे गुरुवारी (दि.२५) रात्री नऊच्या सुमारास घडली.