Maharashtra

धक्कादायक: सुतळी बॉम्ब तोंडात फुटल्याने सात वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

By PCB Author

November 02, 2018

बुलडाणा, दि. २ (पीसीबी) –  सुतळी बॉम्ब तोंडात फुटल्याने एका सात वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक समोर आली आहे. ही घटना बुलडाणा जिल्ह्यातील  पिंपळगाव सराई  येथे मंगळवारी (दि.३० ऑक्टोबर) घडली.

यश संजय गवते (वय ७, पिंपळगाव सराई, बुलडाणा) असे मृत मुलाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी यश त्याच्या मित्रांसोबत घराबाहेर फटाके फोडत होता. खेळता खेळता यश घरात आला आणि काडीपेटीचा डब्बा घेऊन बाहेर गेला. त्यावेळी त्याचे वडील जेवत होते. अचानक काही वेळाने स्फोटाचा आवाज आला. त्याच्या वडिलांनी बाहेर जाऊन पाहिले असता, यश रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. खेळताना यशला सुतळी बॉम्ब सापडला. यशने तो बॉम्ब फोडण्यासाठी विस्तवासमोर ठेवला. पण बॉम्ब फुटलाच नाही. मग यशने सुतळी बॉम्ब पुन्हा हातात घेतला.  सुतळी बॉम्बची वात तोंडात धरत असतानाच तो फुटल्याने यशला गंभीर दुखापत झाली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.