धक्कादायक: सालगड्याच्या मुलासोबत प्रेमविवाह, आई वडिलांकडूनच मुलीची हत्या

0
500

सोलापूर, दि. (पीसीबी) – सोलापुरातील मंगळवेढा तालुक्यात ऑनर किलिंगची घटना समोर आली आहे. खोट्या प्रतिष्ठेसाठी आई वडिलांनी मुलीचा खून केला आहे. बी..एम.एस. चे शिक्षण घेणाऱ्या २२ वर्षांच्या मुलीने सालगड्याच्या मुलासोबत प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून वडिलांनी मुलीला ठार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सलगर बुद्रुक या ठिकाणी ही घटना घडली आहे. रागाच्या भरात वडिलांनी आणि आईने मुलीला ठार केले त्यानंतर तिच्या मृतदेहावर अंत्यसंस्कारही केले.