Desh

धक्कादायक: विष प्राशन केलेल्या महिलेच्या तोंडात स्फोट

By PCB Author

May 16, 2019

अलीगढ, दि. १६ (पीसीबी) – रुग्णालयात उपचार सुरु असताना तोंडात स्फोट होऊन एका विष प्राशन केलेल्या महिलेचा मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील अलीगढ येथे घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री संबंधीत महिलेने विषप्राशन केले होते. यानंतर उपचारासाठी महिलेला अलीगढ येथील जे एन मेडिकल कॉलेजमध्ये आणण्यात आले होते. डॉक्टरांनी महिलेवर उपचार करण्यास सुरुवात केली असता यादरम्यान तोंडात स्फोट झाला. विष बाहेर काढण्यासाठी डॉक्टरांनी तोंडाद्वारे नळी टाकली असता अचानक हा स्फोट झाला. हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेने सल्फरीक अॅसिड घेतले होते. नळी आतमध्ये टाकली असता ऑक्सिजनशी संपर्क आल्यानेच हा स्फोट झाला असावा अशी शक्यता आहे.