धक्कादायक: लैंगिक शोषणाला कंटाळून महिलेने प्रियकरासोबत मिळून केला संपादकाचा खून

0
724

मुंबई दि. १९ (पीसीबी) – इंडिया अनबाऊंडचे संपादक नित्यानंद पांडे यांच्याकडून दोन वर्षांपासून सुरु असलेल्या लैंगिक शोषणाला कंटाळून महिलेने प्रियकरासोबत मिळून पांडे यांचा गळा आवळून खून केला.

याप्रकरणी काशीमीरा लोकल क्राईम ब्रांचने  इंडिया अनबाऊंडच्या ऑफिसमध्ये काम करणारी अंकिता मिश्रा आणि तिचा प्रियकर सतिश मिश्रा या दोघांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संपादक नित्यानंद आपल्या ऑफिसमध्ये काम करणारी अंकिता हिचा गेल्या दोन वर्षांपासून लैंगिक शोषण करत होता. या शोषणाला अंकिता कंटाळली होती. अखेर अंकिता आणि तिचा प्रियकर सतिश या दोघांनी नित्यानंद याचा खून करण्याचा डाव रचला. १५ मार्च रोजी दोघांनी नित्यानंद उत्तन येथे नेले. संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास दोघांनी गळा दाबून नित्यानंद यांचा खून केला. नंतर त्यांचा मृतदेह भिवंडी येथील नाल्यात टाकून फरार झाले. काशीमीरा लोकल क्राईम ब्रांचने या गुन्ह्याचा छडा लावत अंकिता आणि तिचा प्रियकर सतिश या दोघांना अटक केली आहे.