Pune

धक्कादायक : रोहित जुनवणे खून प्रकरणातील संशयित आरोपींची घरे जमावाने पेटवली

By PCB Author

November 03, 2018

औंध, दि. ३ (पीसीबी) – औंधमधील कस्तुरबा वसाहतीत गुरुवारी पहाटे साडेपाच्या सुमारास शिवसेना उपविभाग प्रमुख रोहित जुनवणे याचा धारदार कोयत्याने वार करुन खून करण्यात आला होता. या खूनाचा छडा लावण्यासाठी जलद गतीने तपास चक्र फिरवत गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने तिघा आरोपींना अटक केली.

यानंतर आज (शनिवार) सकाळी काही अज्ञात हल्लेखोरांनी औंध येथील कस्तुरबा वसाहतीमध्ये जाऊन संशयित आरोपींच्या घरावर हल्ला चडवत त्यांची घर पेटवून दिली. या घटनेमुळे संपूर्ण औंध परिसरात भितीचे वातावरण आहे. पोलिस घटना स्थीळी दाखल झाले असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.