धक्कादायक: रांचीमध्ये एकाच कुटुंबातील सात जणांची सामूहिक आत्महत्या

0
574

रांची, दि. ३० (पीसीबी) – झारखंडच्या रांचीमध्येही एकाच कुटुंबातील सात जणांनी सामूहिक आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना आज (सोमवार) सकाळी उघडकीस आली. मूळ बिहारच्या भागलपूर येथील झा कुटुंबिय रांचीमध्ये भाड्याच्या घरात राहत होते, आज त्यांच्या राहत्या घरातच त्यांचे मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मृतांमध्ये दोन लहानग्यांचाही समावेश आहे. घटनास्थळी पोलीस पोहोचले असून तपास सुरू आहे. घरातील आर्थिक परिस्थिती त्यांच्या आत्महत्येचे कारण असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली जात आहे. सकाळी खूप वेळ दरवाजा बंद होता, त्यामुळे शेजाऱ्यांनी घरमालकाला याबाबत माहिती दिली आणि मालकाने याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी दरवाजा तोडला तेव्हा सात लोकांचे मृतदेह आढळून आले. मृतांजवळ कोणतीही सुसाइड नोट आढळलेली नाही.