Videsh

धक्कादायक: म्यानमारमध्ये रॉयटर्स वृत्तसंस्थेच्या दोन पत्रकारांना सात वर्षांची कोठडी

By PCB Author

September 03, 2018

नेपीतॉ, दि. ३ (पीसीबी) – म्यानमारमध्ये रोहिंग्या मुस्लिमांचे कव्हरेज करताना कायद्याचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरुन रॉयटर्स या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेसाठी काम करणाऱ्या दोन पत्रकारांना प्रत्येकी सात वर्षांची कोठडी सुनावण्यात आली आहे.

वा लोन (वय ३२) आणि क्याव सो यू (वय २८) असे या दोन पत्रकारांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, वा आणि क्याव या दोघांना डिसेंबर २०१७ मध्ये अटक करण्यात आली होती. त्यावेळी दोन्ही पत्रकारांनी रोहिंग्या मुस्लिम बहुल रेखीन प्रांतात सुरू असलेल्या नरसंहारावर स्टिंग ऑपरेशन केले होते. यामुळे रोहिंग्या मुस्लिमांचे कव्हरेज करताना कायद्यांचे उल्लंघन केल्याने दोघांना प्रत्येकी सात वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. त्यांच्या रिपोर्टिंगमुळे म्यानमारची सुरक्षा आणि गुप्तता यांचा भंग झाल्याने ही शिक्षा सुनावली जात आहे असे न्यायाधीशांनी स्पष्ट केले. म्यानमार न्यायालयाच्या या निकालावर जगभरातून संताप व्यक्त केला जात आहे. कोर्टाचा निर्णय हा पत्रकारिता आणि माध्यम स्वातंत्र्यावर हल्ला आहे असे म्हटले जात आहे.