धक्कादायक : मौलवीने मशिदीतच आठ वर्षांच्या मुलावर केला लैंगिक अत्याचार

0
808

मुरादाबाद, दि. १७ (पीसीबी) – उत्तर प्रदेशच्या मुरादाबाद येथे एका मौलवीने मशिदीतच आठ वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना मंगळवार (दि.११ सप्टेंबर) रात्रीच्या सुमारास घडली.

मोहम्मद तैय्यब असे आरोपी मौलवीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित मुलाच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्यानुसार मौलवीला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्रीच्या सुमारास पीडित आठ वर्षांचा मुलगा मुरादाबाद येथील मशिदीत आपल्या अन्य मित्रांसह नेहमीप्रमाणे कुराण पठणासाठी गेला होता. त्यावेळी मशिदीतील मौलवीने कुराण वाचून झाल्यानंतर त्याच्या सोबतच्या इतर मुलांना घरी पाठविले. मात्र पीडित मुलाला थांबवून घेतले होते. त्यानंतर त्याने मशिदीतच असलेल्या एका खोलीमध्ये मुलाला नेले आणि तेथे त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला. इतकेच नाही तर याबाबत कुणाला काही सांगितल्यास जीवे ठार मारेन अशी धमकीही दिली. घडलेल्या घटनेनंतर मुलगा खूप घाबरला होता. त्यामुळे दुसऱ्या दिवशीपासून तो मशिदीत जाण्यासाठी टाळाटाळ करू लागला. मशिदीत जायला नकार का देतोस अशी विचारणा त्याच्या वडिलांनी केल्यावर मुलाला रडू कोसळले आणि त्याने घडलेला सर्व प्रकार वडिलांना सांगितला. त्यानंतर त्याच्या वडिलांनी थेट पोलिस स्थानक गाठले आणि मौलवीविरोधात तक्रार दाखल केली. सध्या पोलिसांनी आरोपी मौलवीला अटक केली असून अजून कोणत्या मुलांसोबत त्याने असे कृत्य केले आहे का, याबाबत पोलिस तपास करत आहेत.