Pune Gramin

धक्कादायक: मुळशीत चाकुने वार करुन पतीने केला गरोदर पत्नीचा खून

By PCB Author

February 20, 2019

मुळशी, दि. २० (पीसीबी) – मुळशी तालुक्यातील पिरंगुट येथे पतीने गरोदर पत्नीचा चाकुने वार करुन खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना बुधवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या दरम्यान मुळशी टाँवर मागील इमारतीत घडली.

सुनिल विलास शिंदे याने पत्नी अनिता शिंदे हिचा चाकूने पोटात वार करून खून केला. त्यानंतर स्वतः वर चाकूने वार करून घेऊन आत्महत्या केली. अनिता आणि सुनिल यांचा वर्षभरापूर्वीच विवाह झाला होता. मृत अनिता या गरोदर होत्या. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.