Maharashtra

धक्कादायक: मुंबईत १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

By PCB Author

June 14, 2019

मुंबई, दि. १४ (पीसीबी) – शेजारी राहणाऱ्या तिघा नराधमांनी मिळून एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना सोमवार (दि.१०) रोजी मुंबईतल्या कफ परेड भागात असून आज (शुक्रवार) समोर आली आहे.

तिघेही नराधम हे सध्या फरार असून त्यांच्यावर पॉक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि.१०) रोजी मुंबईतल्या कफ परेड भागात शेजारी राहणाऱ्या तिघा नराधमांनी एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केला. गुन्हा दाखल होताच आरोपी फरार झाले. तिघा आरोपींविरोधात पॉक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे. सध्या देशासह राज्यात अल्पवयीन मुलींवर वाडत चाललेल्या अत्याचाराच्या घटना चिंतेचा विषय झाला असून यावर कठोर निर्णय घेणे आवश्यक झाले आहे.