Pune Gramin

धक्कादायक! मावळ तालुक्यात कोरोनाचा शिरकाव; तळेगाव मध्ये आढळला पॉझिटिव्ह रुग्ण

By PCB Author

May 07, 2020

वडगाव मावळ,दि.७ (पीसीबी) – मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे. एक महिला कोरोना बाधित असल्याचं एका खासगी रुग्णालयाने सांगितले. मात्र, तशी अधिकृत माहिती आली नाही. याबाबत मावळचे आमदार सुनील शेळके यांनी माहिती दिली आहे.

महाराष्ट्रभर कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच मागच्या दोन दिवसांपासून लॉकडाऊन शिथिल करण्यात आले. तळेगाव दाभाडे येथील एका महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त आता समोर येते आहे. मात्र हे रिपोर्ट खासगी रुग्णालयातून आल्याने अधिकृत बोलता येणार नसल्याचे मावळचे आमदार सुनील शेळके यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.