Maharashtra

धक्कादायक : मांजरीला उपाशी ठेवून जीवंत जाळले

By PCB Author

December 04, 2018

मुंबई, दि. ४ (पीसीबी) – ओशिवरा येथे अनोळखी व्यक्तींनी एका मांजरीला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना आज (मंगळवार) सकाळी समोर आली.

याप्रकरणी प्राणीप्रेमींनी ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज ओशिवार येथील गावदेवी बिल्डिंगच्या मागील बाजूस मांजर मृतावस्थेत आढळली. मांजरीला बांधून, तिला उपाशी ठेवण्यात आले आणि नंतर जिवंत जाळण्यात आले, असे सांगण्यात येते. ‘स्थानिकांकडून भटक्या प्राण्यांचा छळ आणि त्यांना निर्दयीपणे मारहाण होत असल्याची माहिती मिळाली होती. अनेक भटक्या प्राण्यांना मारहाण करून त्यांना जायबंदी करून सोडून देण्यात येत असल्याचे प्रकारही घडतात,’ असे प्राणीप्रेमींचे म्हणजे आहे. मांजर ज्या ठिकाणी जळालेल्या अवस्थेत सापडली, तेथे आसपास सीसीटीव्ही कॅमेरेही नाहीत.

मांजरीचे शव परळ येथील रुग्णालयात विच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती ओशीवरा पोलिसांनी दिली आहे.