Maharashtra

धक्कादायक : भावानेच केला १० वर्षीच्या बहिणीवर लैंगिक अत्याचार

By PCB Author

December 14, 2018

मुंबई, दि. १४ (पीसीबी) – भाऊ-बहिणीच्या नात्याला काळीमा फासणारे कृत्यू मुंबई येथील ताडदेव परिसरात घडले आहे. येथील १० वर्षाच्या चिमुरडीवर तिच्या चुलत भावानेच लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

याप्रकरणी ताडदेव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चुलत भावासह, दोघांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी चुलत भाऊ पीडित चिमुरडीच्या घरी कोणी नसल्याचा फायदा घेत तिच्यावर लैंगिक अत्याचार करत होता. या दरम्यान, कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही त्याने पीडित मुलीला दिली होती. धक्कादायक बाब म्हणजे आरोपीने त्याच्या काही मित्रांना ही माहिती दिल्यावर त्यांनीही आळी-पाळीने पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार केले. मागील वर्षभर हा अत्याचाराचा प्रकार सुरू होता. या सर्व प्रकारामुळे पीडित मुलगी मानसिक धक्क्यात होती. शारिरीकदृष्ट्या खचल्याने ती सतत पोटदुखीची तक्रार करायची, आजारी पडायची. त्यामुळे शिक्षकांनी पीडितेला विश्वासात घेऊन कारण विचारले असता, तिने तिच्यासोबत घडलेला घृणास्पद प्रकार सांगितला. घटनेची कल्पना तिच्या पालकांना येताच ताडदेव पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आला आणि तिघांना अटक करण्यात आली. ताडदेव पोलीस अधिक तपास करत आहेत.