Desh

धक्कादायक: ‘बिग बॉस’ च्या आयोजकांकडून महिला पत्रकाराकडे शरीरसुखाची मागणी

By PCB Author

July 14, 2019

हैदराबाद, दि. १४ (पीसीबी) – बिग बॉस तेलुगु सीझन-३ मध्ये प्रतिस्पर्धी म्हणून अंतिम फेरीत निवड करण्यासाठी आयोजकांनी आपल्याकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा खळबळजनक आरोप महिला पत्रकाराने केला आहे.

पोलीस उप-आयुक्त के. एस राव यांनी दिलेल्या माहितीनुसार, बिग बॉस तेलुगु सीझन-३ हा रिअॅलिटी शो २१ जुलैपासून सुरू होत आहे. १३ जुलैला आम्हाला महिला पत्रकार आणि निवेदिकेची तक्रार मिळाली. तक्रार करताना महिलेने सांगितले, तिला मार्च महिन्यात बिग बॉस तेलुगुची ऑफर मिळाली. तिला २१ जुलैपासून सुरू होणाऱ्या बिग बॉस कार्यक्रमामध्ये प्रतिस्पर्धी म्हणून निवडण्यात आले आहे, असे सांगण्यात आले. तिने ऑफरला होकार देताना स्पर्धेच्या आयोजकांची भेट घेतली. भेटीदरम्यान, आयोजकांपैकी चौघांनी तिच्यासोबत गैरवर्तन केले. यासोबतच अंतिम फेरीत निवड होण्यासाठी बॉसला खूश करावे लागेल, असे तिला सांगितले. याप्रकरणी चौघांविरोधात भा.दं.वि नुसार कलम ३५४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उप-आयुक्त के. एस राव करत आहेत.