Pune Gramin

धक्कादायक: बारामतीत पोलिसांकडून सीआरपीएफ जवानाला मारहाण

By PCB Author

February 17, 2019

बारामती, दि. १७ (पीसीबी) – दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्या जवानांच्या शोकसभेची परवानगी मागण्यास गेलेल्या सीआरपीएफ जवानास पोलिसांनी बेड्या घालून मारहाण केल्याची धक्कादायक घटना बारामतीमध्ये घडली.

सीआरपीएफ जवान अशोक इंगवले असे मारहाण झालेल्या जवानाचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, सीआरपीएफ जवान अशोक इंगवले हे दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्या जवानांच्या शोकसभेसाठी परवानगी मागण्यासाठी बारामती तालुका पोलीस ठाण्यात गेले होते. मात्र तेथे त्यांना बेड्या घालून जबर मारहाण करण्यात आली. यामध्ये इंगवले यांना उजव्या हाताला जखमा झाल्या आहेत. तर त्यांची वर्दी देखील फाटली आहे. इंगवले हे ११८ बटालियनचे जवान आहेत. जवानास मारहाण झाल्याचे कळताच पोलिस ठाण्यात नागरिकांनी मोठी गर्दी केली. सबंधित पोलिस अधिकारी व कर्मचार्यांच्या निलंबनाची मागणी केली जात आहे.