Desh

धक्कादायक: बंदुकीचा धाक दाखवून दोघा सख्ख्या बहिणींवर सामूहिक बलात्कार

By PCB Author

June 13, 2019

मुजफरनगर, दि. १३ (पीसीबी) – चार जणांच्या टोळक्यांनी बंदुकीचा धाक दाखवून दोन सख्ख्या अल्पवयीन बहिणींवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना मंगळवार (दि.११) संध्याकाळच्या सुमारास मुजफरनगर जिल्ह्यातील कासेरवा गावात घडली.

याप्रकरणी पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास पीडित १३ वर्षीय आणि १५ वर्षीय दोघी बहिणी उसाच्या शेतात आपल्या आईचा शोध घेण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी आरोपींनी दोघा बहिणींना अडवले. तसेच बंदुकीचा धाक दाखवत त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केला. जर घटनेची कोणाला माहिती दिली किंवा मदतीसाठी रडलात तर तुम्हाल गोळ्या घालून ठार करु अशी धमकी आरोपींनी पीडित मुलींना दिली होती. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध घेत आहेत. घटनेनंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पोलिसांना काही महत्त्वाचे आदेश दिले असून ग्रामीण भागांमध्ये पायी चालत गस्त घालण्यास सांगितले आहे.