Desh

धक्कादायक: पोलीस उपनिरीक्षकाने महिला कॉन्स्टेबला पोलीस ठाण्यातच केले बळजबरी कीस

By PCB Author

December 19, 2018

त्रिची, दि. १९ (पीसीबी) – तामिळनाडूच्या त्रिचीमधील सोमरसमपेट्टाई पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षकाने एका महिला कॉन्स्टेबलवर बळजबरी करत कीस केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून हे फुटेज व्हायरल झाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला.

बाळ सुब्रमण्यम (वय ५०) असे गुन्हा दाखल झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी त्याला निलंबीत करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला कॉन्स्टेबल आणि पोलीस उपनिरीक्षक बाळ सुब्रमण्यम हे सोमरसमपेट्टाई पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. यावेळी बाळ यांनी महिला विरोध करत असतानाही त्यांच्यावर बळजबरी करत वारंवार किस केले. या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.  मात्र या प्रकरणात दोन बाजू समोर येत आहेत. सुब्रमण्यम यांनी आपल्यावरील आरोप नाकारले असून हे संगनमताने करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची सखोल चौकशी करुन न्याय निवाडा करावा. आपण तामिळनाडू पोलिसांकडून प्रतिसादाची प्रतीक्षा करीत आहोत असे ते म्हणालेत. दरम्यान या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.