Pune

धक्कादायक: पुण्यात लग्नाचे आमिष दाखवून सहायक पोलीस निरीक्षकाने केला महिलेवर बलात्कार

By PCB Author

February 03, 2019

पुणे, दि. ३ (पीसीबी) – लग्नाचे आमिष दाखवून एका सहायक पोलीस निरीक्षकाने महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

याप्रकरणी २८ वर्षीय  पिडित महिलेने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय राजाराम मदने (वय ३६, रा. ॲमनोरा टॉवर पार्क, हडपसर, मूळ गणेशवाडी, कर्जत, नगर) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

प्राप्त माहितीनुसार, दत्तात्रय मदने हा भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात सहायक पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत आहे. त्याने २०१७ ते जानेवारी २०१९ या कालावधीमध्ये २८ वर्षीय महिलेसोबत शारीरिक संबंध ठेवले. महिलेने लग्न करण्याबाबत विचारणा केल्यानंतर त्याने तिला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली.  पोलिस निरीक्षक विष्णू पवार तपास करत आहेत.