धक्कादायक ! पुण्यात दुपारपर्यंत कोरोनाग्रस्तांची संख्या दुप्पट

0
363

पुणे, दि.२३ (पीसीबी) : राज्यात सर्वत्र कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आसली तरी पुण्यात परिस्थिती जास्त विदारक आहे. येथे कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आज दुपारपर्यंत तब्बल 650 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. रुग्णवाढीचे हे प्रमाण दुप्पट आहे. सोमवारी 328 नवे कोरोना रुग्ण आढळले होते. एका दिवसात कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट झाल्याने आगामी काही दिवसांत पुण्यात परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.. मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढ आहे. त्यामुळे कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन सरकारने सावध पवित्रा धारण केला आहे. सरकारकडून वेगवेगळे प्रतिबंध घातले जात आहेत. तसेच, नागरिकांना कोरोना प्रतिबंधक नियम पाळण्याचे आवाहनही स्थानिक प्रशासनाकडून केले जात आहे.

मात्र, एवढे सारे कारुनही काही शहरांमध्ये कोरोनाचा प्रसार थांबण्याची चिन्हं दिसत नाहियेत. पुण्यात तर कोरोनाग्रस्तांचा आलेख दिवसेंदिवस वाढतच आहे … पुण्यात आज दुपारपर्यंत तब्बल 650 नवे कोरोना रुग्ण आढळले. यामध्ये संध्याकाळपर्यंत आणखी काही रुग्णांची भर पडण्याची शक्यता आहे. मंगळवारी (22 फेब्रुवारी) फक्त 328 कोरोनाग्रस्त आढळले होते. त्यांनतर फक्त एका दिवसात दुप्पट म्हणजेच तब्बल 650 नव्या बाधितांची येथे नोंद केली गेली. या आकडेवारीवरुन पुण्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याचे स्पष्ट होत आहे. फक्त एका दिवसात कोरोना रुग्णांच्या संख्येत दुपटीने वाढ झाल्यामुळे आरोग्य प्रशासन धास्तावले आहे. येथे आगामी काळात आणखी कडक निर्बंध लागू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.