धक्कादायक: पत्नीने सेक्ससाठी नकार दिला म्हणून पतीने केला शिरच्छेद

0
1229

त्रिची, दि. ८ (पीसीबी) – पत्नीने सेक्ससाठी नकार दिल्याने पतीने पत्नीची भोसकून हत्या करत शिरच्छेद केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना तामिळनाडूतील त्रिचीमधील तिरुवेरंबूरमध्ये रविवारी (दि.७) घडली.

जेसिनथा जॉसबिन (वय २६) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पती डी सनकर सागायाराज (वय ३०) याला तिरुवेरंबूर पोलिसांनी अटक केली आहे. त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी महिन्यात मयत जेसिनथा आणि सागायाराजचे लग्न झाले होते. लग्नानंतर काही महिन्यांनी त्यांच्यात वादावादीला सुरुवात झाली. विमा कंपनीत एजंट असणारा सागायराज कामावर नियमित जात नव्हता. त्यावरुन पती-पत्नीत वारंवार खटके उडायचे. काही महिन्यांपूर्वी सागायाराजने पत्नीला काहीही न कळवता तिचे सोन्याचे दागिने गहाण टाकले होते. यावरुन त्या दोघांमध्ये भांडणे सुरु होती. नवऱ्याच्या या वागण्याला कंटाळून दोन महिन्यांपूर्वी ती तिच्या आई-वडिलांच्या घरी निघून गेली.

३० सप्टेंबरला सागायाराज आणि त्याचे आई-वडिल जेसिनथाच्या घरी गेले व तिची समजूत घालून तिला परत आणले. शनिवारी रात्री दोघांमध्ये भांडण झाल्यानंतर तिने सेक्ससाठी नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या सागायाराजने जेसिनथाची हत्या केली. सागायाराज याला अटक केली असून न्यायालयाने त्याला कोठडी सुनावली आहे.