धक्कादायक ! पतीला निलंबित करण्याची धमकी देत महिलेवर बलात्कार

0
422

छत्तीसगड, दि. ०४ (पीसीबी) – पतीला नोकरीवरुन निलंबित करण्याची धमकी देऊन माजी जिल्हाधिकाऱ्याने महिलेवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार छत्तीसगड येथील जांजगीर चंपा जिल्ह्यात घडला आहे. पीडीत महिलेने माजी जिल्हाधिकाऱ्यावर अश्लिल भाषेत मेसेज, व्हिडिओ पाठवून बोलण्याचा आणि लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. दरम्यान या घटनेप्रकरणी पोलिसांनी तपास करुन माजी जिल्हाधिकारी जनक प्रसाद पाठक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एका सामाजिक संस्थेच्या कामानिमित्ताने जिल्हाधिकाऱी जनक प्रसाद पाठक याला ही महिला भेटण्यासाठी गेली होती. यावेळी तिच्याकडुन मोबाईल नंबर घेऊन काम झाल्यावर फोन करतो असे सांगण्यात आले होते. कामऐवजी या जिल्हाधिकाऱ्याने पीडीत महिलेसोबत अश्लिल मेसेज पाठवणे, व्हिडिओ पाठवण्यास सुरुवात केली. या महिलेचे पती सरकारी कार्यालयात काम करतात. त्यांना कामामध्ये प्रमोशन देण्याचे व संस्थेचे काम पुर्ण करण्यासाठी पीडीत महिलेला या जिल्हाधिकाऱ्याने भेटायला बोलाविले. पीडीत महिलेने नकार दिल्यास पतीला नोकरीवरुन निलंबित करेल अशी धमकी देण्यात आली. कामानिमित्ताने महिला पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी गेली असताना कार्यालयामध्येच बलात्कार केला असल्याचा आरोप महिलेने केला आहे.

ही घटना १५ मे रोजी घडली असून या प्रकरणी पीडीत महिलेने पोलिसात तक्रार देऊन या महिलेच्या फोनमधील सर्व मेसेज आणि व्हिडिओ दाखवल्याची माहिती मिळाली आहे.