धक्कादायक: पगार मिळत नसल्याने प्राध्यापकाने पदव्या जाळल्या

0
790

पुणे, दि. १६ (पीसीबी) – पुण्यात पगार मागितला म्हणून नोकरीवरून काढून टाकण्यात आल्याने संतप्त झालेल्या एका प्राध्यापकाने त्याच्या सर्व पदव्या आणि प्रमाणपत्रे जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सूरज बाळासाहेब माळी असे या प्राध्यापकाचे नाव आहे.

सूरज माळी हे सिंहगड आरएमडी स्कूल ऑफ इंजिनीयरींगमध्ये प्राध्यापक आहेत. थकीत पगार मागितल्याने या महाविद्यालय  प्रशासनाने त्यांना पगार देण्यास नकार दिला. काम करणं हा गुन्हा असेल आणि पगार मागितला म्हणून कामावरून काढले जात असेल तर आजवर मिळवलेल्या पदव्या आणि प्रमाणपत्रे हवेत कशाला? अशा शब्दांत संताप व्यक्त करत माळी यांनी घरातच गॅस पेटवून त्यावर एकएक करत पदव्या जाळल्या. सिंहगडमधील शिक्षकांना बँक कर्जही देत नाही. त्यामुळे माझा कामावरचा विश्वास उडाल्याचेही माळी यांनी सांगितले. माळी यांनी पदव्या जाळत असल्याचा एक व्हिडिओही तयार केला असून तो सर्वत्र व्हायरलही झाला आहे.