Pimpri

धक्कादायक: नेहरुनगरमध्ये तरुणीचा चेहरा असलेला मॉर्फ नग्न फोटा फेसबुकवर केला अपलोड

By PCB Author

October 14, 2018

पिंपरी, दि. १४ (पीसीबी) – एका २६ वर्षीय तरुणीचा चेहरा असलेला नग्न फोटो मॉर्फ करुन तिच्या नातेवाईकाच्या नावाने बनावट फेसबुक अकाऊंट उघडून नातेवाईकांना पाठवत तिला जीवेठार मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना रविवार (दि.७ ऑक्टोबर) पिंपरीतील नेहरुनगर येथे घडली.

याप्रकरणी पीडित २६ वर्षीय तरुणीने अज्ञात इसमाविरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी त्यानुसार अज्ञात इसमाविरोधात कलम ३५४(ड), ५००, ५०७ तसेच माहिती तंत्रज्ञान कलम २००० अनुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका अज्ञात आरोपीने रविवारी पिंपरीतील नेहरुनगर येथे राहणाऱ्या २६ वर्षीय तरुणीचा फोटा एका नग्न फोटाला मॉर्फ केला. तसेच तिच्या काकांच्या नावाने बनावट फेसबुक अकाऊंट तयार करुन त्यावर तो फोटो अपलोड केला. त्यानंतर तो फोटो तिच्या नातेवाईकांना पाठवून तिची बदनामी केली आणि पुन्हा अलाहाबादला आल्यास मारुन टाकण्याची धमकी दिली. पिंपरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उंडे तपास करत आहेत.