मावळात अल्पवयीन प्रेयसीचा प्रियकराने केला खून; प्रियकरानेही आत्महत्या केल्याचा संशय

0
1156

मावळ, दि. ५ (पीसीबी) – अल्पवयीन प्रेयसीचा प्रियकराने ब्लेडने वार करुन खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना बुधवारी सकाळच्या सुमारास वडगाव मावळ येथील निसर्गवारा लॉजवर घडली. घटनेनंतर आरोपी प्रियकर फरार असून त्याने आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळच्या सुमारास वडगाव मावळ येथील निसर्गवारा लॉजमधील रुम नं.३०३ मध्ये प्रियकर श्रीराम सुग्रीव गिरी आणि त्याची अल्पवयीन प्रेयसी थांबले होते. त्यावेळी अज्ञात कारणावरून आरोपी प्रियकराने अल्पवयीन प्रेयसीच्या गळ्यावर, पोटावर आणि हातावर ब्लेडने वार करून खून केला. गंभीर जखमी झालेल्या अल्पवयीन तरुणीचा जागीच मृत्यू झाला. खून केल्यानंतर आरोपी श्रीराम हा घाईघाईत लॉजमधून जात असताना त्याने तेथील कर्मचाऱ्यांना आपली प्रेयसी तयारी करुन खाली येत असल्याचे सांगितले. त्यानंतर संधी साधून त्याने दुचाकीवरुन पळ काढला.

रात्री उशिरापर्यंत वडगाव मावळ पोलिसांचे पथक आरोपीचा शोध घेत होते. दरम्यान, आरोपी प्रियकराची दुचाकी इंद्रायणी नदीकाठी मिळाली असून त्याने आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून एनडीआरएफ पथकाला पाचारण करण्यात आले आहे. वडगाव मावळ पोलिस अधिक तपास करत आहेत.