धक्कादायक: दौंडमध्ये घरघुती वादातून पत्नीवर जीवघेणा हल्ला; कात्रीने कापले नाक

0
467

यवत, दि. २४ (पीसीबी) – घरघुती वादातून पतीने पत्नीवर कुऱ्हाडीने वार करुन गंभीर जखमी केले. तसेच कात्रीने नाक कापून विद्रुप केले. ही धक्कादायक घटना दौंड तालुक्यातील केडगाव चौफुला येथे घडली.

रेखा वाघमारे असे जखमी पत्नीचे नाव आहे. याप्रकरणी पती तानाजी वाघमारे याच्या विरोधात यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तानाजी आणि रेखा या दोघांमध्ये नेहमी किरकोळ घरघुती कारणावरुन भांडण व्हायचे. याच कारणावरुन चिडलेल्या तानाजीने घरातील कुऱ्हाडीने रेखा यांच्या मानेवर, हातावर आणि पायांवर वार करुन गंभीर जखमी केले. क्रृरतेचा कळस म्हणजे तानाजी इतक्यावरच थांबला नाही. त्याने घरातील कात्रीने रेखाचे नाक देखील कापले. रेखाची प्रकृती सध्या चिंताजनक आहे. यवत पोलीस तपास करत आहेत.