Desh

धक्कादायक: दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने तरुणाने आईलाच पेटवले

By PCB Author

December 10, 2018

कर्नाटक, दि. १० (पीसीबी) – दारु पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून एका तरुणाने स्वत:च्या आईलाच पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना गुरुवारी (दि.६) बेंगळुरु येथील सदाशिवनगर परिसरात घडली.

उत्तम कुमार असे आरोपी मुलाचे नाव असून तो सध्या फरार आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी बेंगळुरु येथील सदाशिवनगर परिसरात राहणारा आरोपी उत्तम कुमार याने त्याच्या आईजवळ दारु पिण्यासाठी पैशांची मागणी केली. मात्र आईने त्याला पैसे देण्यास साफ नकार दिला. यामुळे दोघांमध्ये जोरदार भांडण देखील झाले. यामुळे चिडलेल्या उत्तमने आईवर पेट्रोल टाकून पेटवून दिले आणि पसार झाला. या घटनेत आईचा चेहरा, हात आणि छातीला गंभीर दुखापत झाली आहे. आईला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस आरोपी उत्तम कुमार याचा शोध घेत आहेत.