Desh

धक्कादायक…दाक्षिणात्य अभिनेत्री व्ही.जे.चित्रा ची गळफास घेऊन आत्महत्या

By PCB Author

December 09, 2020

चेन्नई, दि.9 (पीसीबी) : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री व्ही. जे. चित्राने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. हि घटना चेन्नईतील एका हॉटेलमध्ये घडली. वयाच्या २८व्या वर्षी तिने असे टोकाचे पाऊल उचलल्याने तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. तिच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. आत्महत्या करण्याच्या काही तासांपूर्वीच चित्राने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक स्टोरी एक पोस्ट केली होती. मात्र ही पोस्ट तिची अखेरची पोस्ट ठरली आहे.

चित्रा रात्री २.३० वाजता चित्रीकरण संपवून हॉटेलवर परतली होती. हॉटेलमध्ये ती होणारा पती प्रसिद्ध व्यावसायिक हेमंत रवीसोबत राहत होती. चित्रा फ्रेश होण्यासाठी गेली पण बराच वेळ ती दरवाजा उघत नसल्यामुळे हेमंतने हॉटेल स्टाफला बोलावले. त्यानंतर त्यांनी दुसऱ्या चावीने दरवाजा उघडला. त्यावेळी चित्राने आत्महत्या केल्याचे समोर आले. ‘पांडियन स्टोर्स’ या मालिकेतील चित्राची भूमिका विशेष गाजली होती. या मालिकेत तिने मुलई ही भूमिका साकारली होती. या मालिकेमुळे चित्रा प्रकाशझोतात आली होती. त्यांमुळे तिच्या निधनामुळे अनेकांना धक्का बसला आहे.