धक्कादायक: तीन वर्षीय चिमुरडीचा बलात्कार करुन खून; आरोपीने गुप्तांगात टाकले लाकूड

1903

गुरुग्राम, दि. १३ (पीसीबी) – हरियाणातील गुरुग्राम येथे एका ३ वर्षीय चिमुरडीवर बलात्कार करुन तिचा खून करण्यात आली. धक्कादायक म्हणजे आरोपीने तिच्या गुप्तांगात लाकूड टाकले. यानंतर त्याने दगडाने चिमुरडीचे डोके ठेचून तिची हत्या केली आणि पसार झाला. ही घटना सोमवारी (दि.१२) सकाळी समोर आली.

पोलिसांनी पकडलेल्या आरोपीचे नाव सुनील (वय २०) असून तो यूपीचा रहिवासी आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी सुनील हा रोजंदारी मजूर आहे. तो आपल्या दोन बहिणींसोबत राहतो, तर मृत चिमुरडी मूळची पश्चिम बंगालची रहिवासी होती. काही दिवसांपूर्वीच तिचे कुटुंब कामाच्या शोधात गुरुग्रामला आले होते. यानंतर रविवारी (दि.११ नोव्हेंबर) दुपारपासून ती गायब होती. आरोपीच्या पाशवी कृत्यामुळे तिच्या गुप्तांगात लाकडाचा तुकडा मोडला होता, जो पोस्टमॉर्टम करून काढण्यात आला. मृत चिमुरडी सेक्टर ६६ जवळ झोपडपट्टीत राहत होती, त्याजवळच एका जागेवर गायी-म्हशींसाठी भुसा ठेवलेला होता. घटनेनंतर तेथेच मृतदेह आढळला. पोलिसांच्या मते, चिमुरडी घराबाहेर खेळत होती, तेवढ्यात आरोपीने तिला भुलवून नेले.

सोमवारी कुटुंबीय मुलीचा आसपास शोध घेत होते. त्यादरम्यान एका शेजाऱ्याची नजर भुस्सा ठेवलेल्या जागेवर गेली, तेथे चिमुकलीचा रक्ताने माखलेला मृतदेह होता. पोलिसांनी घटनास्थळी येऊन चौकशी केली. त्यांच्यासोबत फॉरेन्सिक टीम आणि काही सीनियर ऑफिसर्सही होते. पोलिसांनी भादंवि कलम ३०२, पॉक्सो अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे.