धक्कादायक… डोक्याला रिवाॅल्वर लावून विवाहितेचा गर्भपात

0
861

वाकड, दि. ९ (पीसीबी) – विवाहितेच्या डोक्याला रिवाॅल्वर लावुन विवाहितेला आणि तिच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देऊन तिचा गर्भपात केला असल्याची फिर्याद वाकड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

23 वर्षीय विवाहितेने याप्रकरणी शनिवारी (दि. 8) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती, सासू, सासरे, दीर आणि जाऊ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार जुलै 2019 पासून 6 मे 2021 या कालावधीत थेरगाव आणि वाल्हेकरवाडी येथे घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी महिलेला वारंवार शारीरिक आणि मानसिक त्रास दिला. तसेच आरोपी पती याने विवाहितेच्या डोक्याला रिवॉल्वर लावून तिला आणि तिच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच जबरदस्तीने तिचा गर्भपात केला. विवाहितेच्या इच्छेविरोधात पतीने तिच्यासोबत अनैसर्गिक संबंध ठेवले. यास विरोध केला असता पतीने विवाहितेला माफ़हन केली. आरोपी दिराने विवाहितेशी गैरवर्तन करून तिचा विनयभंग केला असल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.