Bhosari

धक्कादायक: चाकणमध्ये २४ वर्षीय तरुणीचे अपहरण करुन बलात्कार

By PCB Author

March 21, 2019

चाकण, दि. २१ (पीसीबी) – “तुझ्याशी माझ्या लग्ना विषयी बोलायचे आहे”, असे सांगून एका टेम्पो चालकाने २४ वर्षीय तरुणीचे टेम्पोमध्ये अपहरण करुन टेम्पोमध्येच बलात्कार केला. ही धक्कादायक घटना बुधवारी (दि.२०) दुपारी अडीचच्या सुमारास मौजे सावरदरी गावाच्या हद्दीतील हुंदाई कंपनीच्या बाजुला असलेल्या कच्च्या रोडवर घडली.

याप्रकरणी पिडित २४ वर्षीय तरुणीने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, निलेश बाळु पवार (वय २४, रा. रेल्वे स्टेशनच्या पलिकडे केशवनगर पवारवस्ती, वडगाव मावळ) या टेम्पो चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी आरोपी निलेश याने पिडित तरुणीला “तुझ्याशी माझ्या लग्ना विषयी बोलायचे आहे”, असे सांगून टेम्पोत ढकलून अपहरण केले. त्यानंतर सावरदरी गावाच्या हद्दीतील हुंदाई कंपनीच्या बाजुला असलेल्या कच्च्या रोडवर टेम्पो नेऊन टेम्पोमध्येच या तरुणीवर बलात्कार केला. आणि पसार झाला. याप्रकरणी निलेश याच्याविरोधात चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो सध्या फरार आहे. पोलीस उपनिरीक्षक पासलकर तपास करत आहेत.