धक्कादायक : चाकणमध्ये मामानेच केला अल्पवयीन भाचीवर अत्याचार

0
1786

चाकण, दि. २ (पीसीबी) – घरात अभ्यास करत बसलेल्या १३ वर्षीय अल्पवयीन भाचीवर मामानेच अत्याचार केल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. ही घटना चाकण पोलीस ठाणे हद्दीमध्ये घडली.

याप्रकरणी पिडित १३ वर्षीय मुलीने चाकण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, मुलीच्या ३९ वर्षीय मामाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवार (दि.२६ नोव्हेंबर) सकाळी सातच्या सुमारास पिडित १३ वर्षीय अल्पवयीन मुलगी त्यांच्या घरातील वरच्या मजल्यावरील रुममध्ये अभ्यास करत बसली होती. यावेळी मुलीच्या ३९ वर्षीय मामाने तिच्या रुममध्ये प्रवेश करत तिच्यावर अत्याचार केला. आणि घडलेल्या प्रकाराबाबत कोणाला सांगितल्यास जीवेमारण्याची धमकी दिली. मुलगी घाबरली असल्याने तीने शनिवारी (दि.१ डिसेंबर) आरोपी मामा विरोधात तक्रार दाखल केली. याप्रकरणी अद्याप नराधम मामाला अटक करण्यात आलेली नाही. महिला पोलीस उपनिरीक्षक शिंदे तपास करत आहेत.