Chinchwad

धक्कादायक: गहुंजेत सरपंच पत्नीचा गळा आवळून खून करण्याचा प्रयत्न

By PCB Author

June 25, 2019

चिंचवड, दि. २५ (पीसीबी) – गहुंजे गावच्या सरपंच महिलेचा पतीनेच गळा आवळून खून करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

याप्रकरणी सरपंच शीतल किरण बोडके (वय २८) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती किरण निर्घृन बोडके (वय ३८, रा.भूमकर चौक, वाकड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी किरण याने सरपंच पत्नी शीतल यांच्याकडे माहेरहून दोन कोटी रुपये आणण्याची मागणी केली. तर किरण याने शीतल यांचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. किरण याचे परस्त्रियांशी अनैतिक संबंध असून याबाबत शीतलने विचारणा केली असता किरण याने त्यांना मारहाण केली. बुधवारी (दि.१९) रात्री या दोघांमध्ये याच कारणावरुन पुन्हा वाद झाला. यावेळी चिडलेल्या किरणने ‘तुला मारूनच टाकतो’ असे म्हणत शीतल यांचा गळा दाबून खून करण्याचा प्रयत्न केला, असे शीतल यांनी त्यांच्या फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.