धक्कादायक: खेड तालुक्यात विजेची तार कोसळ्याने ५५ मेंढ्या ठार

0
432

खेड, दि. २४ (पीसीबी) – विजेची तार अंगावर कोसळल्याने तब्बल ५५ मेंढ्या ठार झाल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. ही घटना रविवारी (दि.२३) सायंकाळच्या सुमारास खेड तालुक्यातील कडूस-टोकेवाडी येथील आवटे मळ्यात घडली.

कडूस परिसरात रविवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपून काढले. वादळामुळे टोकेवाडी येथील आवटे मळ्यात विद्युत वाहिनीची तार तुटून शेतातील मेंढ्यांच्या कळपावर पडली. यात विजेच्या धक्क्यामुळे शिवाजी नाथा तिखोळे व बाळू नाथा तिखोळे (रा. ढवळपुरी, जि. नगर) या मेंढपाळ भावांच्या तब्बल ५५ मेंढ्या जागेवरच ठार झाल्या. घटनास्थळी मृत मेंढ्यांचा अक्षरशः ढीग लागलेला आहे. तार तुटलेली विद्युत वाहिनी सायगाव-कडूस दरम्यान भिमानदीच्या बाजूकडे आहे. घटनेवेळी दहा ते पंधरा माणसांचे तिखोळे कुटुंब तुटलेल्या तारेपासून थोडे दूर अंतरावर होते, त्यामुळे हे कुटुंब अपघातातून थोडक्यात बचावले.