धक्कादायक खुलासा: ‘मल्ल्या भारतात आल्यावर आम्हाला गुपचूप कळवा, त्याला ताब्यात घेण्याची गरज नाही’

0
1670

मुंबई, दि. १८ (पीसीबी) – मल्ल्या भारतात आल्यावर आम्हाला गुपचूप कळवा, त्याला ताब्यात घेण्याची गरज नाही असे आदेश सीबीआयने मुंबई पोलिसांना दिले होते असा धक्कादायक खुलासा आता समोर आला आहे.

१६ ऑक्टोबर २०१५ रोजी काढलेल्या पहिल्या लुकआउट नोटीशीत ‘देश सोडून जाण्यास मनाई करावी’ हा रकाना भरला होता, याचाच अर्थ त्या नोटिशीनंतर मल्ल्या देश सोडू शकत नव्हता. २४ नोव्हेंबर २०१५ रोजी दुसरी लुकआउट नोटीस जारी करण्यात आली होती, त्यावेळी रात्री उशीरा दिल्ली विमानतळावर उतरला होता. या नोटिशीत ‘देश सोडून जाण्यास मनाई करावी या रकान्याऐवजी ‘व्यक्तीच्या येण्या/जाण्यासंदर्भात माहिती द्यावी’ हा रकाना भरला होता. म्हणजेच मल्ल्याला अटक करु नये, केवळ माहिती द्यावी असे स्पष्टपणे सांगण्यात आले होते. त्याच्या चार महिन्यांनंतरच मल्ल्या देश सोडून पळाला.

२३ नोव्हेंबर २०१५ मध्ये मल्ल्या दिल्लीमध्ये येणार आहे याची सूचना देण्यात आली होती. त्यावर दुसऱ्याच दिवशी म्हणजे २४ तारखेला मुंबई पोलिसांना पत्र लिहून, मल्ल्याला ताब्यात घेण्याची गरज नाही, जर गरज पडली तर नंतर त्याला ताब्यात घेता येऊ शकते, असे म्हटले होते. म्हणजे मल्ल्याविरोधात अलर्ट असूनही सीबीआयने काहीच माहिती नसल्याचे सोंग घेतल्याचे स्पष्ट होत आहे.