धक्कादायक: कोथरुडमध्ये दोघा चिमुरड्या बहिणींवर ज्येष्ठ नागरिकाकडून लैंगिक अत्याचार

0
487

कोथरुड, दि. २० (पीसीबी) – एका ६० वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने दोघा चिमुरड्या बहिणींवर लैंगिक अत्याचार करुन फरार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना मंगळवारी (दि. १९) दुपारच्या सुमारास सुतारदार परिसरात घडली.

याप्रकरणी मुलींच्या पालकांनी कोथरुड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार, त्याच्या घराशेजारी राहणाऱ्या ६० वर्षीय वृध्दाविरोधात बलात्कार आणि पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुतारदरा भागात एक गरीब कुटुंब आहे. या कुटुंबात एक साडे तीन आणि एक साडेचार वर्षांची अशा दोन सख्या बहिणी आहेत. मंगळवारी दुपारी यांचे पालक दोघींना घरी एकटेच ठेवून कामासाठी बाहेर गेले होते. यादरम्यान घरात कोणी नसल्याचे पाहून त्यांच्या घराशेजारी राहणाऱ्या राहणार्‍या ६० वर्षांच्या नराधमाने या दोघींवर लैंगिक अत्याचार केला.

घडलेला हा सर्व प्रकार मुलींच्या आत्याच्या ५ वर्षांच्या मुलाने पहिला. मामा-मामी घरी आल्यानंतर त्याने ही बाब त्यांना सांगितली.  या घटनेबाबत पीडित मुलींच्या पालकांनी ६० वर्षीय आरोपी ज्येष्ठ नागरिकाला जाब विचारल्यानंतर त्याने तिथून पळ काढला. या प्रकारानंतर पीडित मुलींच्या पालकांनी कोथरुड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. आरोपी सध्या फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.