धक्कादायक: एकतर्फी प्रेमातून विवाहितेच्या एक वर्षीय चिमुकलीवर बलात्कार

0
545

इंदूर, दि. १ (पीसीबी) – एकतर्फी प्रेमातून विवाहित महिलेच्या एक वर्षीय चिमुकलीवर २० वर्षीय तरुणाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना मध्य प्रदेशमधील इंदूर येथे शुक्रवारी (दि.१८) रात्रीच्या सुमारास घडली.

याप्रकरणी इंदूर पोलिसांनी नराधम २० वर्षीय तरुणाला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी २० वर्षीय तरुण हा चिमुकलीचा नातेवाईक आहे. त्याचे पीडित चिमुकलीच्या आईवर एकतर्फी प्रेम होते. हा प्रकार लक्षात येताच महिलेने आरोपीसोबत बोलणे बंद केले. यामुळे तो तरुण चिडला होता. शुक्रवारी दुपारी नराधम तरुण महिलेवर बलात्कार करण्याच्या उद्देशाने तिच्या घरी गेला. मात्र, त्यावेळी तो महिलेच्या घरात जाऊ शकला नाही. रात्री उशिरा तो नराधम पुन्हा महिलेच्या घरी गेला. तो मद्यधूंद अवस्थेत होता. पीडित मुलीचे आई- वडील वरच्या खोलीत झोपले होते. तर दोन्ही मुली दुसऱ्या खोलीत झोपल्या होत्या. आधी नराधम तरुणाने चार वर्षांच्या मुलीवर बलात्काराचा प्रयत्न केला. मात्र, तिने प्रतिकार करताच नराधमाने तिला सोडून दिले आणि तिच्या एक वर्षाच्या बहिणीवर बलात्कार केला. मोठ्या मुलीने आऱडाओरडा करताच तिचे वडील खाली आले. मात्र, तोवर नराधमाने तिथून पळ काढला होता. सध्या दोन्ही मुलीवर रुग्णालयात उपचार सुरू असून पोलिसांनी नराधमाला अटक केली आहे. पोलिसांनी नराधम तरुणाला अटक केली आहे.