धक्कादायक, उस्मानाबादेत मतदान करताना फेसबुक लाईव्ह; चार तरुणांविरोधात गुन्हा

0
560

उस्मानाबाद, दि. १८ (पीसीबी) – साऱ्या जगाचे लक्ष लागलेल्या भारताच्या लोकसभा निवडणुकीत अनेक धक्कादायक प्रकार घडत आहेत. कुठे नवरदेव मतदान करत आहेत तर कुठे व्हीव्हीपॅटवरून भांडणं होत आहेत. आज अकोल्यात एका मतदाराने मतदायंत्रच फोडले आहे तर दुसरीकडे मतदान करण्यासाठी गेलेल्या एका तरुणाने चक्क फेसबूक लाइव्ह केल्याचा खळबळजनक प्रकार उस्मानाबादमध्ये घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार तरुणांविरोधात सायबर क्राइम अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील कारवाई सुरू आहे.