धक्कादायक : आळंदीतील बेपत्ता अल्पवयीन तरुणीवर तिघांकडून बलात्कार

2571

भोसरी, दि. १८ (पीसीबी) – आळंदीतून बेपत्ता झालेल्या एक १७ वर्षीय अल्पवयीन तरुणीवर तिघा जणांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना शनिवारी (दि.१३) समोर आली.

याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार अब्दुल अहमद शेख (वय ३३, रा. काटे वस्ती दिघी) आणि विजय हनुमंत ननवरे (वय ३०, रा. चक्रपाणी वसाहत भोसरी) या दोघांना अटक करण्यात आली आहे. तर रामचंद नावाचा इसम अद्याप फरार आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आळंदी येथून १७ वर्षीय पीडित तरुणी ११ सप्टेंबरपासून बेपत्ता होती. याप्रकरणी तिच्या घरच्यांनी आळंदी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. यादरम्यान निगडी यमुनानगर येथील एकाल बेपत्ता महिलेचा शोध घेत असताना निगडी पोलीसांना आळंदीतील ती बेपत्ता १७ वर्षीय तरुणी सापडली. तिला आळंदी पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्यावेळी ती खूप घाबरलेल्या अवस्थेत होती.

पोलिसांनी आणि पीडित तरुणीच्या आईने तिला विश्वासात घेऊन तिची विचारपूस केली असता तिने सांगितले कि, ती राहत्या घरातून दिनांक ११ सप्टेंबर रोजी पायी चालत विश्रांतवाडी येथे गेली असता तेथे भेटलेल्या रामचंद नावाच्या कार चालकाने तिला कारमध्ये बसून चंदननगर येथील चंद्र लॉज येथे नेले आणि बलात्कार केला. बलात्कार केल्यानंतर त्याने १२ सप्टेंबरला विमाननगर येथे सोडले. तेथे ओला उबेर कार चालक अब्दुल शेख हा भेटला त्याने तिची चौकशी केली असता पीडितेने सावत्र आई त्रास देत असल्याने घर सोडून आल्याचे सांगितले त्यामुळे अब्दुल शेख याने त्याचा मित्र विजय ननवरे राहणार चक्रपाणी वसाहत भोसरी याची बायको मयत झाली आहे. त्याच्याकडे जाऊन राहा असे सांगून तिला घेऊन मित्र विजय ननवरे त्याचे घरी सोडले तेथे विजय ननवरे याने पीडितेस दोन दिवस  कोंडून ठेवून तिच्यावर बलात्कार केला.

शुक्रवारी (दि.१४ सप्टेंबर) अब्दुल शेख हा पीडितेला भेटायला आला तेव्हा तिने विजय ननवरे याने केलेल्या अतिप्रसंग बाबत अब्दुल याला माहिती दिली. त्यावेळी विजय ननवरे आणि अब्दुल शेख यांनी चर्चा केली विजय ननवरे हा घराबाहेर गेला असता अब्दुल शेख यांनी खोलीचा दरवाजा बंद करून त्यानेसुद्धा पीडितेवर बलात्कार केला. याप्रकरणी आळंदी पोलीसांनी अब्दुल आणि विजय या दोघांना अटक केली असून त्या दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. तर आरोपी रामचंद हा अद्याप फरार आहे. आळंदी पोलीस त्याचा शोध घेत आहेत.