धक्कादायक: आईने केलेल्या अमानूष मारहाणीमुळे ३ वर्षीय चिमुरडा कोमात

0
500

कोची, दि. १९ (पीसीबी) – ऐकत नसल्याच्या कारणावरुन एका आईने स्वत:च्या ३ वर्षीय मुलाला लाकडी दांडक्याने अमानूष मारहाण केल्याने तो कोमात गेल्याची धक्कादाय घटना समोर आली आहे. ही घटना बुधवारी (दि.१७) केरळ येथील कोची अलुवामध्ये घडली.

प्राप्त माहितीनुसार, बुधवारी रात्री अलुवा येथील खासगी रुग्णालयात एक व्यक्ती त्याच्या तीन वर्षांच्या मुलाला घेऊन आला. मुलगा टेबलवरून खाली पडल्याचे त्याचे म्हणणे होते. पण दुखपातीचे स्वरूप पाहता डॉक्टरांना या प्रकारावर संशय आला. तसेच चिमुरड्याला शरीरावर चटके दिल्याचे दिसत होते. त्यामुळे संशय बळावला. अखेर डॉक्टरांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी मुलाच्या आई- वडिलांची कसून चौकशी केली असता सर्व प्रकार उघड झाला.

महिला ही मूळची झारखंडची आहे. मुलगा हा मस्ती करतो आणि कोणाचेही ऐकत नसल्याने तिने मुलाला बेदम मारहाण केली. मारहाणीत मुलाच्या मेंदूच्या उजव्या बाजूला गंभीर दुखापत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मुलगा सध्या कोमात असून त्याची प्रकृती गंभीर आहे. केरळ पोलिसांनी या प्रकरणी झारखंड पोलिसांशी संपर्क साधला आहे. पीडित मुलाचे आणखी लोक नातेवाईक आहेत का, याचा पोलीस शोध घेत आहेत.