धक्कादायक: अपघातातील मृत बालकाचा आत्मा बोलावतो म्हणून तरुणाची आत्महत्या

0
1452

नागपूर, दि. १६ (पीसीबी) – अपघातात मृत झालेल्या बालकाचा आत्मा बोलतो, आपल्याला बोलावतो या कारणावरून एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

सौरभ नागपुरकर (वय १८) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याने आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहिली आहे. त्यात त्याने हे विचित्र कारण दिले आहे. या घटनेनंतर परिसरात आश्चर्य आणि हळहळ व्यक्त केली जात आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौरभने २ महिन्यांपूर्वी एक अपघात पाहिला होता. या अपघातात लहान मुलाचा मृत्यू झाला होता. ही घटना त्याला वारंवार दिसत होती, असे त्याने त्या चिठ्ठीत लिहीले आहे. शिवाय त्या मुलाचा आत्मा त्याच्या बरोबर बोलत असल्याचा उल्लेख त्याने त्यात केला आहे. हा आत्मा वारंवार आपल्याकडे बोलवायचा असेही त्याने लिहिले आहे.  या सर्व गोष्टींना कंटाळून आत्महत्या करत असल्याचे सौरभने सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे. ही नोट पोलिसांनी जप्त केली आहे. या मागे अन्य काही कारण आहे का, याचा शोध पोलीस घेत आहेत.