दोन झाडे तोडून चोरून नेली; पाच जणांवर गुन्हा दाखल

0
457

पिंपरी, दि. २ (पीसीबी) – खराळवाडी येथे गणेश मंदिराच्या पाठीमागे असलेली दोन झाडे पाच अनोळखी व्यक्तींनी तोडून चोरून नेली. याप्रकरणी भारतीय दंड विधान कलम 379, 34, महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम 1975 चे कलम 21 (1) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संदिप पांडूरंग गायकवाड (वय 45, रा. किवळे गाव, ता. हवेली) यांनी याप्रकरणी सोमवारी (दि. 1) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चार ते पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार, 10 ते 17 ऑक्टोबर या कालावधीत आरोपींनी खराळवाडी येथील गणेश मंदिराच्या मागे असलेली दोन रेन ट्री जातीची झाडे कापली. ती झाडे सुमारे 25 ते 30 वर्ष वयाची होती. आरोपींनी झाडे तोडून ती चोरुन नेली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.