Bhosari

दोन गावठी कट्टे आणि अकरा जिवंत काडतुसांसह मोशीतून एकाला अटक

By PCB Author

November 21, 2018

मोशी, दि. २१ (पीसीबी) – दोन गावठी कट्टे आणि अकरा जिवंत काडतुसांसह एकाला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई भोसरी एमआयडीसी पोलिसांनी मंगळवारी (दि.२०) दुपारी अडीचच्या दरम्यान मोशीतील मार्केट यार्ड चौकात केली.

योगेश बाजीराव दौंडकर (रा. शेळ पिंपळगाव, मारुती मंदीराजवळ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्या विरोधात भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी भोसरी एमआयडीसी पोलिसांना त्यांच्या खबऱ्याकडून माहिती मिळाली कि, मोशीतील मार्केट यार्ड चौकात एक इसम येणार असून त्याच्याजवळ पिस्तूल आहे. यावर भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यातील पथकाने त्या ठिकाणी सापळा रचून संशयीत आरोपी योगेश याला ताब्यात घेतले. त्याच्याजवळील मोपेड दुचाकी (क्र. एमएच/१४/डीआर/९३२२) ची तपासणी केली असता दुचाकीच्या डिक्कीमध्ये दोन गावठी कट्टे आणि अकरा जिवंत काडतुसे आढळून आली. पोलिसांनी ती जप्त करुन योगेश याला अटक केली. भोसरी एमआयडीसी पोलिस अधिक तपास करत आहेत.