दोन उकडलेल्या अंड्यांचे बिल फक्त १७०० रुपये; मुंबईतील फोन सीझन्स हॉटेलची कमाल

0
646

मुंबई, दि. १२ (पीसीबी)- अभिनेता राहुल बोसला दोन केळ्यांसाठी फाईव्ह स्टार हॉटेलने ४४२ रुपये आकारल्याचे प्रकरण ताजे असताना, आणखी एका फाईव्ह स्टारने अशीच करामत केली आहे. मुंबईतील फोन सीझन्स हॉटेलमध्ये दोन उकडलेल्या अंड्यांसाठी तब्बल १७०० रुपये बिल आकारण्यात आले. कार्तिक धर नावाच्या एका लेखकाने या बिलाचा फोटो ट्वीट करुन अभिनेता राहुल बोसलाही टॅग केले आहे. ‘भावा आंदोलन करुया का,’ असा गंमतीशीर प्रश्नही केला.

दोन उकडलेल्या अंड्यांची किंमत फार-फार तर ३० रुपये असू शकेल. मात्र फोर सीझन्स हॉटेलने तब्बल १७०० रुपये आकारुन सगळ्यांनाच तोंडात बोट घालायला लावले. एवढेच नाही तर बिलावर दोन ठिकाणी ऑम्लेटचे वेगवेगळे दर आकारल्याचे दिसते. दोन ऑम्लेटची किंमत १७०० रुपये तर एका ऑम्लेटची किंमत ८५० रुपये दिसते.

कार्तिक धरने हा फोटो ट्वीट केल्यानंतर तो तुफान शेअर होऊ लागला. दरम्यान, या प्रकरणावर हॉटेलने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. अनेक युझर्सनी फोर सीझन्स हॉटेलची फिरकी घेतली.