दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार दोन्ही आरोपींवर बलात्कारचा गुन्हा दाखल

0
427

मुंबई, दि.१० (पीसीबी) – मीरा-भाईंदरमध्ये अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाल्याच्या दोन घटना समोर आल्या आहेत. याप्रकरणी दोन्ही आरोपींवर बलात्कार आणि पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनिल जेटली (वय ५१) असे या आरोपीच नाव आहे.

प्राथमिक माहितीनुसार ,मीरारोड परिसरात एका १५  वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला. यावेळी मुलगी घरी एकटी असताना ५१ वर्षीय अनिल जेटली नावाच्या व्यक्तीने तिच्यावर अत्याचार केला. आरोपी अनिल जेटली हा पीडितेच्या ओळखीचा असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. घडलेला प्रकार लक्षात येताच पीडितेच्या घरच्यांनी पोलिसांत धाव घेतली आणि अनिल जेटलीला अटक करण्यात आली.

दुसरी घटना भाईंदर पश्चिममध्ये घडली. येथे वर्षीय मुलीवर बलात्कार झाला आहे. पीडित मुलगी खेळत असताना उमाशंकर गुप्ता (वय४३) नावाच्या भाजी विक्रेत्याने चॉकलेटचे आमिष देऊन तिला बोलावले आणि तिच्यावर बलात्कार केला. जखमी मुलीला नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी नराधम उमाशंकर गुप्ताला अटक करण्यात आली आहे.

या दोन्ही प्रकरणात आरोपींवर पोस्को, तसेच बलात्कारचा गुन्हा दाखल करुन दोन्ही घटनेतील आरोपींना अटक केली आहे. अशी माहिती मीरारोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक संदीप कदम यांनी दिली.