देहूरोड येथे हत्याराने वार करून तरूणाचा खून; दोन संशयीत ताब्यात

0
1306

देहूरोड, दि. १३ (पीसीबी) – देहूगाव येथे तिघांनी एका तरूणावर धारदार हत्याराने वार करून खून केल्याचा प्रकार घडला. हा प्रकार शुक्रवारी (दि. १२) रात्री बाराच्या सुमारास घडला. मात्र, हत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.

गणेश बलभीम बनगर (वय २१, रा. येलवाडी, खेड) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. या प्रकरणी संशयीत आरोपी अनिल उर्फ सोन्या अशोक घोलप, कुणाल संजय माने आणि अनिल कुऱ्हाडे या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश हा काल (शुक्रवारी) कामानिमित्त देहूगाव परिसरात आला होता. तो स्पिपरचे काम करतो. देहूगाव येथील भैरवनाथ चौकात त्याच्यावर हत्याराने वार करण्यात आले. यावेळी त्याच्या मानेवर वार केले तसेच पोटात भोसकण्यात आले.

या हल्यात गणेशच्या रक्ताच्या थारोळ्या पडल्या होत्या. नागरिकांनी उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापुर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. देहूरोड पोलिस तपास करत आहेत.