Banner News

देहूरोड येथे शाळेत येण्यास मनाई केल्याने दहावीतील विद्यार्थ्यांची आत्महत्या

By PCB Author

July 04, 2018

देहूरोड, दि. ४ (पीसीबी) -शिक्षकांनी शाळेत येण्यास मनाई केल्याने दहावीतील विद्यार्थ्यांने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. देहूरोड येथील खाणीत विद्यार्त्यांने उडी मारून आत्महत्या केल्याचा प्रकार मंगळवारी (दि.३) संध्याकाळी साडे सातच्या सुमारास समोर आला आहे.

शुभम सुरवाडे असे या विद्यार्थ्यांचे नांव आहे. एनडीआरएफचे जवानांनी शुभमचा शोध सुरू केला आहे. शिकवणी संपवून विठ्ठलनगरच्या दगडी खाणीकडे जात असल्याचे शुभमने मित्रांना सांगितले होते. मात्र,बराच वेळ तेथून शुभम परत आला नसल्याने त्याचा शोध घेण्यात आला.

देहूरोड येथील केंद्रीय विद्यालय शाळा क्रमांक २ मध्ये शुभम दहावी इयत्तेत शिकत होता. चित्रकलेचे पुस्तक फाडल्यावरून शाळेत शुभमचा मित्राबरोबर वाद झाला होता. त्यानंतर शिक्षकांनी त्याला पाच दिवस शाळेत न येण्याची शिक्षा दिली होती. शिक्षकांनी केलेल्या शिक्षेमुळेच आपण आत्महत्या करत असल्याचे शुभमने सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे.

अधिक तपास देहूरोड पोलीस करत आहेत.