देहुरोड येथील भाजप नगरसेवक विशाल खंडेलवाल गोळीबार प्रकरणी दोघांना अटक

0
718

देहुरोड, दि. १७ (पीसीबी) – गुरुवार (दि.१३) दोन तरुणांनी देहुरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे विद्यमान नगरसेवक विशाल उर्फ जिंकी खंडेलवाल यांच्यावर गोळीबार केला होता. याप्रकरणी देहुरोड पोलिसांनी दोघांना पिस्तुलासह अटक केली आहे.

साबीर समीर शेख (वय १९, रा. तळेगाव स्टेशन) आणि साईतेजा उर्फ जॉनी शिवा चिंतामल्ला (वय १९, रा. ऑर्डीनन्स फॅक्टरी, देहुरोड) असे अटक करण्यात आलेल्या दोघा आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी देहुरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी साबीर आणि साईतेज हे रॅकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. त्यांच्यासह त्यांचे भाऊ आणि मित्रांवर देहुरोड पोलीस ठाण्यात काही दिवसांपूर्वी गुन्हा दाखल झाला होता. त्या दोघांवर कारवाई करण्यातयावी यासाठी विशाल यांनी देहुरोड बाजारपेठ बंद ठेऊन निषेध व्यक्त केला होता. याच गोष्टीचा राग मनात धरुन दोघा आरोपींनी विशाल यांच्यावर गोळीबार केल्याचे तपास समोर आले आहे. पोलिसांनी साबीर आणि साईतेज या दोघांना अटक केली असून त्यांच्याजवळील पिस्तूल देखील जप्त केली आहे. देहुरोड पोलीस अधिक तपास करत आहेत.